आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता पर्वचे आयोजन करण्यात आले असून, सर्व समाज बांधवांकरिता ही वैचारिक प्रबोधनाची पर्वणीच ठरणार आहे. वैचारिक मंथनासोबतच यवतमाळ आयडॉल, करिअर्स गायडन्स, युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंग भरण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, समता ऑलिम्पियाड स्पर्धा व महिलांच्या विविध स्पर्धेचे वैचारिक तथा मनोरंजनात्मक कार्यक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण समाज बांधवांच्या कलागुणांना वाव देणारे ठरणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, तथा फुले-शाहू-आंबेडकरी गीतांची स्वरांजली, समता विचारवेध सत्रे, एक क्षण गौरवाचा, विविध वैचारिक पर्व होणार आहे. सोबतच ८ एप्रिलला सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे व इंडियन आयडॉल आशिष कुलकर्णी यांचा हिट्स ऑफ म्युझिकल शो संयोजक समता पर्व बचत गटाच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. दि. ७ एप्रिलला समता पर्व प्रतिष्ठानतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समता पर्वचा आरंभ होईल.
याच दिवशी सायंकाळी गजल मुशायऱ्याच्या उद्घाटकीय सत्रासह ७ ते १० पर्यंत गझल गायक रुद्र कुमारांची सुमधुर गझल मैफिल शाम -ए- गझल रंगणार आहे.गझल मैफिलीचे निवेदन ख्यातनाम गझलकार किरण कुमार मडावी करणार आहे. दि. ८ एप्रिलला “ हिट्स ऑफ म्युझिकल शो ” चा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, अॅड. रामदास राऊत, इंजि. दीपक नगराळे, इंजि. मनोहर शहारे, प्रा. सत्यवान देठे इत्यादीची उपस्थिती राहणार आहे. दि. ९ एप्रिलला सकाळी ११ वाजता रंग भरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ एप्रिलला सकाळी महात्मा फुले कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता वादविवाद स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी होणार आहे. औरंगाबाद येथील आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे ‘बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले’ या विषयांवर तर डॉ . प्रभाकर गायकवाड यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर जाहीर व्याख्यान होणार आहे. दि. १२ एप्रिलला एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कॉ. संजय भालेराव यांचे संयोजक आहेत.
सदर स्पर्धा सेलिब्रेशन हॉल, मेडीकल चौक, यवतमाळ येथे होणार आहे. तसेच प्रसिध्द इतिहासतज्ञ डॉ. सरफरोज अहमद , सोलापूर यांचे सत्यवादी इतिहास या विषयांवर व संध्या सराडकर अमरावती यांचे महिला विषयावर जाहिर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. लिला भेले असून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा जाहीर सत्कार होणार आहे. १३ एप्रिलला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी यवतमाळ आयडॉलची अंतिम फेरी व विविध स्पर्धा, तसेच भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहे. याच बरोबर समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री. आ. संजय राठोड, माजी मंत्री, आ .मदन येरावार, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, खा.सुरेश धानोरकर, खा .भावना गवळी, आ.अशोक उईके तसेच माजी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी व समतापर्वची कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला समता पर्वाचे अध्यक्ष अॅड. रामदास राऊत, प्रा. अंकुश वाकडे, इंजि. मनोहर शहारे, प्रमोदिनी रामटेके, राजूदास जाधव, मदन फाळेगावकर, अॅड. इम्रान देशमुख, के. एस. नाईक, पल्लवी रामटेके, प्रा. विजय डोंगरे, प्रा. सत्यवान देठे, जितेंद्र ढाणके, इंजि. दीपक नगराळे, नारायण थूल. जे. डी. मनवर, इंजी. आनंद देवगडे, सूरज खोब्रागडे, अॅड. राहुल पाटील, मुख्य समन्वयक अनिल रामजी आडे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, एम. के. कोडापे, प्रा. माधव सरकुंडे, जियाभाई, मीनाक्षी वेट्टी, डॉ. दिलीप महाले, किशोर भगत, डॉ. बाळकृष्ण सरकटे, डॉ. चंद्रकांत सरदार, घनश्याम नगराळे, राहुल कोचे, भोजराज भगत, चंद्रकांत वाळके, पवन धोटे, डॉ. मिलींद कांबळे, कमल खंडारे, प्रविण देशमुख, कवडू नगराळे इत्यादीची उपस्थिती होती, असे प्रसिध्दी प्रमुख विजय मालखेडे यांनी कळवले आहे.
डॉ. कन्हैया कुमार यांचे १० एप्रिलला सकाळी ११ वाजता जाहीर व्याख्यान
दि. १० एप्रिलला सकाळी ११ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धेचे व काव्य स्पर्धेसह विश्वरत्न कला महोत्सव ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन आहे. भारतातील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. कन्हैया कुमार, नवी दिल्ली यांचे भारतीय लोकशाही व भारताचे भविष्य या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रमोदिनी रामटेके तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ . प्रवीण इंगोले दिल्ली हे राहतील.
महिला कुलगुरू डॉ. सोनाझरिया मिंज यांचे हस्ते उद्घाटन
दि. ९ एप्रिलला समता पर्वाचे उद्घाटकीय सत्र असुन समता पर्वचे उद्घाटन भारतातील पहिली आदिमवासी महिला कुलगुरू डॉ. सोनाझरिया मिंज यांचे हस्ते होणार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी विकास आयुक्त उद्योग डॉ. हर्षदीप कांबळे, प्रसिध्द पत्रकार आशुतोष नवी दिल्ली यांचे जाहीर व्याख्यान ‘ माध्यमांची जबाबदारी आणि भारताचे भविष्य’ या विषयांवर होणार आहे. या कार्यक्रमाला अॅड. फिरदोस मिर्झा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे व उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याच सत्रात यवतमाळ आयडॉलचे उद्घाटन होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.