आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:कृषी संकुलाच्या बांधकामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी; संकुलाचे 60 टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिठ्ठेवाड यांनी दिली

वाशीम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १ मे रोजी वाशीम येथील सुंदर वाटिका परिसरात बांधण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मिठ्ठेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार उपस्थित होते.

देसाई यांनी बांधकामाची पाहणी करताना कार्यकारी अभियंत्यांना संकुलाचे बांधकाम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावे, बांधकाम वेगाने पूर्ण करताना बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असावी, अशा सूचना दिल्या.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिशा देणारा देणारे हे कृषी संकुल असल्यामुळे बांधणीचे काम पूर्ण होताच शेतकऱ्यांना त्या संकुलातून चांगल्या प्रकारे कृषी विषयक प्रशिक्षण व कृषी प्रात्यक्षिके मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संकुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून बांधकामावर आतापर्यंत २ कोटी खर्च झाले आहेत. संकुलाचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिठ्ठेवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...