आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य-सरपंच आमने-सामने:फुलसावंगीच्या सरपंचांवर अविश्वासाची टांगती तलवार

फुलसावंगी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ लाख ६५ हजार रिकव्हरीचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर राजकीय सत्ताचक्र हे कोणत्या दिशेने फिरेल याकडे लोकांच्या नजरा लागलेल्या असतांना आता कथित अफरातफरीच्या मुद्द्यावर काही सदस्य व सरपंच आमने सामने आल्याच्या चर्चा होत असून हा वाद विकोपाला गेल्यास सरपंचांवर अविश्वास आणण्याची तयारीत बहुसंख्य सदस्य असल्याची अंतर्गत कुजबुज आहे.

फेब्रुवारी २२ मध्ये येथील ग्राम पंचायत सदस्य कुणाल नाईक व इतर आठ सदस्यांनी सरपंच व सचिव हे संगनमत करून १५ वित्तच्या निधीत मोठे गौडबंगाल करीत असल्याचे आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. चौकशी समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात धक्कादायक बाबी बाहेर आल्या असून अहवालात निधीत खरोखरच घोळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामधील १४ लाख ६५ हजार एव्हढी रक्कम समभागात तत्कालीन अभियंता, उपअभियंता, फुलसावंगी ग्राम पंचायत तत्कालीन सरपंच व सचिव यांच्याकडून वसूल करण्याचा अहवाल वजा आदेश समितीने सादर केला आहे.

हा अहवाल चव्हाट्यावर आल्यानंतर फुलसावंगीच्या राजकारणाची चक्रे फिरू लागली असून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीतच एवढा मोठा घोटाळा कसा झाला असे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. तर विरोधक सत्ताधाऱ्यांचा पारदर्शक प्रशासनाचा दावा फोल झाल्याचा आरोप करत आहे. जाब विचारण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली असल्याची चर्चा असून या बैठकीत संतप्त सदस्यांनी महिला सरपंचांचा थेट राजीनामाच मागितला. या मुद्द्यावर चांगलीच हमरी-तुमरी झाली असल्याचे बोलले जात असून या बैठकीनंतर ग्राम पंचायत सत्ताधारीमध्ये ठिणगी पडली असून १४ सदस्यांची सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी असल्याची चर्चा असून १७ सदस्यांच्या बॉडीमध्ये हे बहुमत ठरू शकते म्हणून सरपंचांना पायउतार व्हावे लागते की काय याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. जर तसे झाले तर कथित घोटाळ्याचा हे पहिला बळी ठरतील.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा
समितीने जो अहवाल दिला आहे. त्यात आरोप सिद्ध झाले असल्यामुळे सरपंचांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अन्यथा ना इलाजाने अविश्वास ठराव आणण याची वेळ येईल.
कुणाल नाईक, ग्राम पंचायत सदस्य, फुलसावंगी.

बातम्या आणखी आहेत...