आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे महिन्याच्या पहिल्या चार ते पाच दिवसात उन्हाचा पारा भडकण्याचे चिन्हे होती. राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. सलग तीन ते चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. अशात मंगळवार, ३ मे रोजी यवतमाळचा पारा ४३.५ अंश सेल्सियसवर पोहचला होता.
दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आकाशात ढगांची गर्दी जमली होती. तर शहरात काही भागात तुरळक असा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात दमटपणा मोठ्या प्रमाणात वाढला असून, वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुरूवार, दि. ५ मे रोजी पर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.