आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने राबवलेल्या सर्वच प्रक्रियेला आयोगाने स्थगिती दिली आहे. परिणामी, शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी आरक्षणाची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही.
अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या सर्कल नुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे. मतदार यादी बनवण्यापासून आरक्षणसुद्धा नव्याने काढल्या जाइल. त्यामुळे झेडपीत पूर्नर आगमनाचे स्वप्न बघणाऱ्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवीत झाल्या आहे.
जिल्ह्यात वाढलेल्या लोकसंख्येमुळे यंदा आठ गट वाढल्याने ६९ वर गत, तर १३८ गणाची संख्या पोहोचली होती. अशात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयामुळे मागिल आठवड्यातच आरक्षण काढण्यात आले. महिलांना ५० टक्के आरक्षणानुसार जिल्हा परिषदेत ३५ टक्के जागा निश्चित झाल्या होत्या. तर अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती १५, नागरिकांचा मागास प्रवर्ग ११, आणि सर्वसाधारण ३५ जागांचे आरक्षण काढण्यात आले होते.
असे असताना शासनाने जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची संख्येत फेरबदल होणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने राबवण्यात आलेली संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जागांच्या आरक्षणाची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. जैसे थे परिस्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रीया थांबविण्यात आल्याने झेडपीत पूर्नर आगमनाची स्वप्न बघणाऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वीच्या गट आणि गणांच्या सूत्रांवर होणार आहे. त्यामुळे नव्याने गट आणि गणाचे आरक्षण काढल्या जाईल. तर मतदान याद्या प्रसिद्ध करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
निवडणुका लांबण्याची शक्यता वाढली
आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक प्रक्रीया राबवण्यात सुरूवात झाली होती. आता संपूर्ण प्रक्रियाच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रीया नव्याने राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रीया राबवण्यासाठी आता बराच कालावधी लागला आहे. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.