आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगता‎:खासदारांच्या मध्यस्थीने‎ उपोषणाची झाली सांगता‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारेगाव तालुक्यातील‎ शेतकऱ्यांसह सामान्य‎ नागरिकांच्या विविध समस्या‎ घेऊन काँग्रेसने तहसील समोर‎ आमरण उपोषण सुरू केले होते.‎ तिसऱ्या दिवशी खासदार बाळू‎ धानोरकर यांच्या मदतीने सर्व‎ मागण्यांवर तोडगा निघाला.‎ यावेळी मान्यवराच्या हस्ते लिंबू‎ सरबत पाजून उपोषण सोडण्यात‎ आले. राष्ट्रसंतांच्या भजनाने‎ उपोषणाची सुरुवात व सांगता‎ करण्यात आली.‎ शेतकरी समस्या व इतर मागणी‎ साठी मारेगाव तालुका काँग्रेस‎ कमिटीच्या वतीने राष्ट्रसंतांच्या‎ भजनाच्या गजरात तालुका अध्यक्ष‎ मारोती गौरकार यांच्या‎ नेतृत्वाखाली गुरुवारपासून‎ आमरण उपोषण सुरु होते.

त्या‎ उपोषणाला खासदार बाळू‎ धानोरकर यांनी शनिवारला‎ सकाळीच भेट देत,‎ उपोषणकर्त्यांच्या मागणी संदर्भात‎ चर्चा करून सर्व विभागाच्या‎ अधिकाऱ्याशी चर्चा करित‎ उपोषणकर्त्यांना ज्युस पाजून‎ उपोषण सोडले, वीज समस्या,‎ वाघाची दहशत, तालुक्यातील‎ चाळणी झालेले रस्ते, अतिवृष्टी‎ भरपाई न मिळणे सोबतच नियमीत‎ कृषी कर्जदारांना ५० हजार रुपये न‎ मिळणे या मागणीसाठी उपोषण‎ झाले.

समस्या प्रती जागृत‎ नसलेल्या प्रशासन व्यवस्थेला‎ जागे करण्यासाठी काँग्रेसच्या‎ वतीने उपोषणाचे हत्यार उपसत‎ तहसिल कार्यालयासमोर दि. १‎ डिसेंबरपासून भजनाच्या गजरात‎ आमरण उपोषण सुरु करण्यात‎ आले. अधिकाऱ्याशी चर्चा करून‎ समस्या निकाली काढण्या संदर्भात‎ सकारात्मक चर्चा करत‎ उपोषणकर्ते मारोती गौरकार,‎ प्रफुल्ल विखनकर, अरविंद‎ वखनोर, माणिक पांगुळ यांना‎ खासदारांनी ज्युस देऊन‎ उपोषणाची सांगता केली.‎ यावेळी नरेंद्र ठाकरे, अरुणा‎ खंडाळकर, वंदना आवारी,‎ शंकुतला वैद्य, संध्या, खांदलकर,‎ टिकाराम कोंगरे, शंकरराव‎ मडावी, संजय खाडे, वसंतराव‎ आसुटकर, अशोक धोबे, रवींद्र‎ धानोरकर, महादेव कुत्तरमारे,‎ गजानन खापने, समीर सय्यद,‎ यादवराव पांडे, यादवराव काळे‎ सय्यद, अंकुश माफुर, गंगाधर‎ ठावरी, संतोष थेरे उपोषण स्थळी‎ उपस्थित होते .‎

बातम्या आणखी आहेत...