आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम त्वरित सुरू व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोरील जागेत उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे कार्याध्यक्ष अशोक मोरे त्यांचे सहकारी गणेश रोंघे यांनी रविवारी (दि. ९) सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला सोमवारी (दि. १०) आमदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली. या वेळी अधिकाऱ्यांशी बोलून कर्मचारी निवासस्थानाचे जुने बांधकाम पाडण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळून लवकरच उप जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळताच उपोषणकर्त्यांनी आमदारांच्या हस्ते सरबत प्राशन करून उपोषण सोडले.
या वेळी आमदार बळवंत वानखडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नालट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, महेश खारोडे, अर्चना पखान, अमर शिंगणे, बाळासाहेब काळमेघ, विपुल नाथे, रमेश सावळे, सिद्धार्थ सावळे, बंडू मेसरे, भानुदास राक्षसकर, किरण वानखडे, पियुष मेटकर, मदन भोंडे, विजय वानखडे, पवन धुळे, बापूराव बाळापुरे, संतोष शेळके, नागोराव वाहुरवाघ, सचिन भावे, विदर्भकुमार बोबडे, संजय मेश्राम, विनीत रोकडे, सुरेश मेश्राम, एच. एल आठवले, शरद लव्हाळे आदींसह अनेकांनी उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.