आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पत्नीची हत्या करणाऱ्या‎ पतीला दहा वर्षांची शिक्षा‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला‎ पांढरकवडा वि. अति सत्र‎ न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा‎ सुनावली. हा निर्णय सोमवार, दि.‎ १० एप्रिलला ठोठावण्यात आला‎ असून सूरज भावेदी रा. चौबीसा‎ मध्य प्रदेश असे आरोपी पतीचे‎ नाव आहे.‎ मध्य प्रदेशातील चौबीसा येथील‎ सूरज भावेदी, त्याची पत्नी‎ सोनावती यांच्यासह सहा जण वणी‎ तालुक्यातील मुरधोनी येथील डॉ.‎ दामोधर आवारी यांच्या बंड्यावर‎ शेत मजुरीचे काम करण्यासाठी‎ आले होते. अशात दि. ४ मार्च‎ २०१९ रोजी शिरपूर येथे जत्रा‎ असल्याने त्या जत्रेत सूरज याची‎ पत्नी सोनावती , त्याचबरोबर‎ दुर्गावती धुर्वे, खादुराम आदी गेले‎ होते.

त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या‎ सुमारास ते सर्व जत्रेतून परत‎ आले. सायंकाळी ७ वाजताच्या‎ सुमारास सूरज आणि त्याची पत्नी‎ सोनावती यांच्यात वाद निर्माण‎ झाला. यावेळी दुर्गावती आणि तिचे‎ वडील रघुनाथ यांनी धाव घेवून‎ सूरज आणि सोनावती यांना‎ समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र‎ सूरज याने बाजूला पडून‎ असलेल्या फरशी आणि विटाने‎ बेहोश होईपर्यंत सोनावतीला‎ मारहाण केली. अश्यात ती गंभीर‎ जखमी झाल्याने तिचा जागीच‎ मृत्यू झाला होता .‎