आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:एकमेकांना सहकार्य करून मानवतेचा परिचय वृद्धिंगत करावा : जिल्हाधिकारी, रेडक्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 203 दात्यांचे रक्तदान

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्तीच्या परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्य करून मानवतेचा परिचय वृध्दींगत करावा, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व रेड क्रॉस सोसायटी यांच्या द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे रविवार दि. ८ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल २०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधर, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, रेडक्रॉसचे जनरल सेक्रेटरी जलालुद्दीन गिलाणी, कोषाध्यक्ष देविदास गोपलानी, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता राठोड, प्रा. धनश्याम दरणे इ. मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांचे सोबत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार रुपाली बेहरे, मनीषा चव्हाण, प्राचार्य अविनाश शिर्के, अॅड. सीमा लोखंडे, अॅड. धनंजय लोखंडे, डॉ. अजय लाड यांचेसह २०३ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. सर्व रकत्दात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. रक्त संकलन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय रक्तपेढीच्या चमूने केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार बुटे यांनी केले. तर रेडक्रॉसच्या कार्याची माहिती जलालुद्दीन गिलाणी यांनी दिली. सूत्रसंचलन रक्तदान शिबिराचे प्रकल्प अधिकारी डॉ. अजय लाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विनोद भोंगाडे, डॉ. सी. बी. अग्रवाल, नगर पालिका प्रशासनाचे डॉ. विजय अग्रवाल, निमा संघटनेचे डॉ. राखुंडे, डॉ. डेहनकर, उद्योजक राजुभाऊ निवल, डॉ. विजय कावलकर, डॉ. हातगावकर, प्राचार्य अविनाश शिर्के, मंगेश वैद्य, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सतीश मून, संजय हातगांवकर, के. बी. यादव, विलास पंचबुध्दे, रत्नदिप मेश्राम, किशोर येंडे, गोपाल गायकवाड, नरेंद्र उके, सचिन परचाके, विजय खडसे, रेमंड युको डेनिम, सारा स्पींटेक्स इंडिया लि., रविराज इंडस्ट्रिज, वाधवाणी फार्मसी कॉलेज, अमोलकचंद महाविद्यालय एन. सी. सी. कॅडेट्स, राज्य कर्मचारी संघटना, महसूल संघटना, एन. एस. एस. विद्यार्थी, तहसिल कार्यालय, वणी, मारेगांव, केळापूर, दारव्हा, दिग्रस, नेर, यवतमाळ, पटवारी संघटना व कोतवाल संघटना व इतर सर्व सामाजिक संस्थांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...