आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला:शहरातील पांढरकवडा मार्गावरील घटना, शहर ठाण्यात तिघांवर गुन्हे नोंद

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या रिलायन्स पेट्रोलपंप परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रवविारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंटी उर्फ चेतन उईके (३१) रा. मिलींद सोसायटी, यवतमाळ असे जखमी तरूणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिंदेनगर परिसरातील मिलींद सोसायटीतील तरूण बंटी उईके हा शनविारी सकाळी मित्र नयन याला घेण्यासाठी शारदा चौक येथे गेला होता. यावेळी बंटी हा नयन व त्याच्या बहिणीला घरी घेवून जात असतांना रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ शुभम थोरात याच्यासह दोघांनी बंटीला आवाज देवून थांबवले. यावेळी शुभम थोरात याने गाडी बाजूने घे म्हणत वाद घातला. त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून बंटी याच्या मानेवर धाव चाकूने वार करीत जखमी केले. तसेच वाहनाची तोडफोड करीत नुकसान केले. दरम्यान जखमी बंटी याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभम थोरात याच्यासह दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

तरुणाच्या डोक्यावर फोडली बियर शहरातील छोटी गुजरी परिसरातील शविनाथ बारमध्ये जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडण्यात आली असून त्याला मारहाण देखील करण्यात आली. या प्रकरणी जखमी मंगेश कटरे याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राज थोरात, अक्षय थोरात दोघेही रा. इंदिरा नगर, यवतमाळ याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...