आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी जेरबंद:लोखंडी फर्म चोरणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सहारा पार्क व प्रणव नगर येथून २४ ऑगस्ट रोजी १३ नग लोखंडी फर्म चोरी गेले होते. ही चोरी झाल्याची माहिती आणि तक्रार पर्वतीनगर येथे राहणारे अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फार यांनी दिली होती. त्यानंतर ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किसन जाधव, सहाय्यक पोलीस कर्मचारी सुदर्शन चव्हाण, डीबी पथक अशोक चव्हाण, कुणाल मुंडोकार, मुन्ना आडे, संजय पवार, सतिष शिंदे यांना तपासाचे चक्रे फिरवताच चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ज्ञानेश्वर दीपक वाघमारे वय २६ वर्षे व कैलास विश्वनाथ बंदुके वय २४ वर्ष दोघेही रा. माणिकडोह असे त्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडुन चोरीला गेलेले बांधकाम साहित्य १३ नग फर्म ज्याची अंदाजे किंमत १६ हजार ९०० व दुचाकी अंदाजे किंमत तीस हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासात घटनास्थळ पंचनामा करुन तक्रारकर्त्यांच्या चौकशीत माणिक डोह येथील एम. एच. २९, ए. एफ. ७१५८ या दुचाकीधारकावर संशय आल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने पोलिस पथकाने तपास करून या आरोपींना जेरबंद केले.

बातम्या आणखी आहेत...