आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध बँकांच्या एमटीएममध्ये पैसे नसून केवळ कचरा पडलेला असतो. तसेच एमटीएममध्ये सुरक्षा रक्षकही तैनात नसतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरीक पैस काढण्यासाठी एमटीएममध्ये जातात परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना बँकेत जावे लागते. बँकेत रांगेत उभे राहून दोन तीन तासांनंतर नंबर लागल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैस काढण्याचा सल्ला देतात.
बँक जोपर्यंत उघडत नाही, तोपर्यंत एमटीएममध्ये पैसे नसतात. याच कारणाने नागरिकांना बँक उघडण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. एटीएममधून पैस मिळत नसल्याने आणि बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एमटीएममध्ये पैसे शोधण्यासाठी नागरिकांना या एटीएममधून त्या एटीएमकडे सैरावैरा पळावे लागत आहे. यासोबतच जवळपास सर्वच बँकांच्या एमटीएममध्ये सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.