आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न मार्गी:तेवीस वर्षांपासून रखडलेला अनुकंपा नियुक्तीचा प्रश्न मार्गी

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या आस्थापनेवरील मागील २३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. एकूण १०९ पदांच्या यादीतील १५ अनुकंपाधारकांना नियुक्ती मिळाली आहे.

शासकिय सेवेत असतांना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपाच्या माध्यमातून सेवेत सामावुन घेण्यात येते. नगर परिषदेच्या सेवेत असतांना मृत्यू पावलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या वारसास तब्बल २३ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मागिल २३ वर्षापासुन अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ता रखडल्या होत्या. यात वर्ग तीनचे ४१, तर वर्ग चारचे ५३ कर्मचारी, असे एकुण १०९ पदांचा समावेश आहे. शासन निर्णयाप्रमाणे वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याकरीता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर सामाईक अनुकंपा प्रतीक्षा सूची ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, पुसद, दिग्रस, उमरखेड, नेर, दारव्हा, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा या नगर पालिका आणि कळंब, मारेगाव, महागाव, राळेगाव, बाभूळगाव, झरीजामणी ह्या नगर पंचायतच्या आस्थापनेवरील पदांची सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम आखला होता. मंजूर पदाची बिंदुनामावली अद्यावत करुन घेण्यात आली. सर्व अद्यावत बिंदुनामावल्या मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्तांकडे तपासणी, मंजूरीकरीता पाठविण्यात आल्या. आयुक्त कार्यालयाशी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून बिंदू नामावली मंजुर करुन घेतली.

शासनाच्या १९ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार वर्ग तीनचे सामाईक अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांच्या शैक्षणिक, व्यवसायीक अर्हतेमधील वाढी अंतर्भुत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. कागदपत्राच्या पडताळणी अंती प्रतीक्षा याद्या अद्यावत करण्यात आल्या आहे. शासनाच्या २२ डिसेंबर २०२१ च्या धोरणानुसार रिक्त पदाच्या २० टक्के ह्या प्रमाणात वर्ग तीनचे अनुकंपा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी रिक्त पदे, अनुशेष, शैक्षणीक अहर्ता विचारात घेऊन जिल्ह्यातील नगर परिषदेमध्ये पंपऑपरेटर, उद्यान पर्यवेक्षक, विजतंत्री, लिपीक टंकलेखक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपीक टंकलेखक, अशा एकुण १३ उमेदवारांना, तर वर्ग चारच्या २ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

पदस्थापनेच्या ठिकाणी उमेदवार झाले रूजू
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते १० ऑक्टोंबर २०२२ ला नियुक्त्यांबाबतचे शिफारसपत्र उमेदवारांना देण्यात आले. अनुकंपातून नियुक्ती दिलेले उमेदवार नगर परिषद, नगरपंचायतीत रुजू झाले आहेत. उर्वरित पदे सन २०२३ मध्ये रिक्त पदाच्या २० टक्के प्रमाणे प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठता आणि पात्रता धारक उमेदवारांकडून भरण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...