आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रमाणपत्र वितरण:भावी शिक्षकांचा प्रवास खडतर, शिक्षकांनी पूरक व्यवसाय निवडावे

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्ययन अध्यापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या बी. एड. प्रशिक्षणार्थी भावी शिक्षकांना सद्या परिस्थितीत स्पर्धेच्या युगात प्रत्येकांनाच शिक्षकांची नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. पुढील प्रवास अत्यंत खडतर आहे. तेव्हा भाषा शिक्षकांना पुरक व्यवसाय म्हणून अध्ययन अध्यापनाचे साहित्य तयार करणे, ऑडिओ बुक तयार करणे, कोचिंग सेंटर, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे असे व्यवसाय करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन अमलोकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी जिजाऊ शिक्षण महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात केले.

येथील जिजाऊ शिक्षण महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या २०१९ -२१ या सत्रातील बी. एड. विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ शिक्षण समितीचे उपाध्यक्ष प्रा. दिनकर वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार पाटील, जिजाऊ शिक्षण समितीचे सचिव अनंत अद्रावलकर, सदस्य प्रा. अनिल कावळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या उन्हाळी २०२१ च्या परीक्षेत संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आलेल्या महाविद्यालयातील ऋतुजा राजेंद्र गुल्हाने हिया जिजाऊ शिक्षण समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दिवंगत प्रा. प्रभाकर गोसावी पुरस्कार तसेच पदवी प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देवून तिचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपस्थित २०१९ -२१ या सत्रातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी बी.एड. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कार्यानुभव प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुहासकुमार पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात आज विद्यार्थ्यांना जे हवे आहे ते ज्या शिक्षकांजवळ असेल तोच भविष्यात शिक्षक म्हणून टिकेल. तेव्हा प्रत्येकाने शिक्षकी पेशातील कौशल्य गांभीर्याने आत्मसात करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिनकरराव वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून भाषा व शब्दांवर प्रभुत्व ठेवावे असे आवाहन केले तसेच शोधू कुठे मी तुला? मीच अजून मला न शोधले! ही स्वामी विवेकानंदांची कविता सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य सुनिल कावळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चैतन्य घुगे, संचलन वैष्णवी दिवटे, राहुल पाचपुते तर आभार गौरी रहाटे हिने मानले. कार्यक्रम संयोजक प्रा. सुरेंद्र राऊत, प्रा. योगेश निमजे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी डॉ. प्रकाश नागदेवते, डॉ. मनिषा मुलकलवार, प्रा. विजय देऊळकर, प्रा. नीलेश भगत, रविंद सुळके, प्रसाद दाबके, शशिकांत बोंद्रे आदींसह कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...