आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या प्रकरण:नाईक हत्या प्रकरणातील मारेकरी अद्यापही फरारच; खून करणाऱ्या आरोपींचा पोलिस घेताहेत शोध

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादाचे सेटलमेंट करायचे आहे म्हणून बोलावून वैभव नाईक या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर सुहास खैरकार आणि नयन सौदागर या दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना पाटीपुरा परिसरातील जयभीम चौकात शनिवार, रात्री घडली. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी लोटला, मात्र अद्याप एकही मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात आला नाही.

शुभम वासनिक (२६), बंटी उर्फ रत्नदीप पटाले (२२), करण तिहले (२३), अर्जुन तिहले (२२), रोशन उर्फ डीजे नाईक (२५), प्रथम रोकडे (२१), अभी कसारे (२०) सर्व रा. जयभीम चौक, पाटीपुरा, यवतमाळ यांच्यासह अन्य तिघांवर खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. शहरातील पाटीपुरा परिसरातील शुभम वासनिक हा त्याच्या मित्रासह ३० एप्रिलला रात्री १० वाजता शासकीय रुग्णालय परिसरात मद्यप्राशन करीत होता. यावेळी नयन सौदागर आणि वैभव नाईक यांनी शुभम वासनिक याच्यासह त्याच्या मित्र मंडळींना या ठिकाणी मद्यप्राशन करू नका, पोलिस आले तर तुमच्या बरोबर आम्हाला पण त्रास होईल, असे म्हटले.

त्यावेळी बंटी, रोशन उर्फ डिजे नाईक, करण, अर्जुन आदींनी नयन याला शिविगाळ करीत आमच्या मधात कशाला येतो, म्हणून मारहाण केली. त्यानंतर दि. ७ मे रोजी या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी पाटीपूरा परिसरातील जयभिम चौकात बोलावले होते. सुहास, नयन आणि वैभव नाईक या तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...