आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:विठोली येथील सार्थकच्या मारेकऱ्याचा‎ अद्याप पत्ताच नाही; पोलिसांकडून चौकशी‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विठोली मारुती येथील‎ एका १८ वर्षीय युवकाचा तीक्ष्ण‎ शस्त्राने वार करून खून केल्याची‎ घटना काल रविवार, २ एप्रिल रोजी‎ घडली होती. मात्र कोणतेही कारण‎ पुढे नसल्याने पोलिसांपुढे सार्थकच्या‎ खुन्याच्या शोध घेण्याचे आव्हान उभे‎ होते. घटनेनंतर चौथा दिवस उजाडला‎ मात्र अद्याप मारेकऱ्याचा पत्ता‎ लागलेला नाही.‎ विठोली मारुती येथील रहिवासी‎ सार्थक व त्याचे वडील दीपक गावंडे‎ हे दोघे जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून‎ आपल्याच शेतातील मक्याचे भारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी गेले होते. पहिला भारा‎ घेऊन वडील दीपक गावंडे हे घरी‎ आले व अर्ध्या तासाने दुसरा भारा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी आले असता सार्थक‎ मृतावस्थेत पडलेल्या स्थितीत‎ आढळला.

सार्थकच्या डोक्यावर‎ तीक्ष्ण शास्त्राने जबर प्रहार केल्याचे‎ घाव घटनास्थळी दिसून आले.‎ सार्थक किंवा त्याच्या वडिलांचे‎ गावात कोणतेही वाद नसतांना‎ सार्थकचा खून कसा झाला, याबाबत‎ आश्चर्य व्यक्त होत असल्याने‎ गावकऱ्यांनी श्वान पथकाद्वारे‎ तपासणी करण्याची मागणी केली‎ होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी‎ श्वान पथक बोलावून तपासणी केली‎ मात्र श्वान जागीच घुटमळल्याने‎ कुठलाही शोध लागला नव्हता. रात्री‎ उशिरापर्यंत गावामध्ये पोलिसांकडून‎ चौकशी सुरूच होती. त्यामुळे‎ सार्थकच्या खुन्याच्या शोध घेण्याचे‎ आव्हान पोलिसांपुढे उभे आहे.‎