आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेतच खून:जिल्ह्यात हत्येचे सत्र थांबता थांबेना; साखरा येथे तरुणाचा झोपेतच खून

दिग्रस11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील दुसऱ्या माळ्यावर झोपून असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाची झोपेतच धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. २ ऑगस्टला सकाळच्या सुमारास दिग्रस तालुक्यातील साखरा येथे उघडकीस आली. विठ्ठल विजय जाधव वय २५ रा. साखरा ता. दिग्रस असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याच्या हत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांवर गुन्हे नोंदवून शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, दिग्रस तालुक्यातील साखरा येथील विठ्ठल जाधव हा तरूण पुणे येथे कंपनीत कामाला होता. १५ दिवसापूर्वी तो काही कामानिमीत्त आपल्या साखरा गावी आला होता. दि. १ ऑगस्टला रात्री जेवण करून तो दुसऱ्या मजल्यावर झोपायला गेला. दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तो खाटेवर रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर धारधार शस्त्रांचे खोलवर घाव दिसत होते. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ घेवून पाहणी केली. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात पाठविला.

यावेळी यवतमाळ येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने जागीच गिरक्या घेत तेथेच थांबले. त्यामुळे कोणताच सुगावा लागला नाही. विठ्ठल जाधव यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर घाव घालून त्याची निर्घृणपणे हत्या का करण्यात आली. याबाबत पोलिसांनी तपासचक्रे फिरवणे सुरू केले आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आहे. त्यापैकी २ भाऊ विवाहित तर १ भाऊ अविवाहित आहे. मृत सुद्धा अविवाहित होता. दारव्हा उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. खुनातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

बातम्या आणखी आहेत...