आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जांब येथील तलाव महिला बचत गटाला द्यावा; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

घाटंजी तालुक्यातील जांब येथील तलावाचे मूल्यांकन करून महिला बचत गटाला प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी शेकडो महिलांनी गुरूवार, दि. २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.

घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत जांब येथील तलावाचे २०१८ मध्ये श्रीराम महिला ग्राम संघाने लिलावा दरम्यान घेतला. तलावात दोन लाख मात्सबीज सोडले. त्यांनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने पन्नास टक्के माल सुद्धा काढू शकले नाही. त्यामुळे महिला ग्राम संघाला नुकसान सहन करावा लागला. यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून तलाव परत महिला महासंघाला देण्यात यावा याची मागणी केली होती. ग्रामपंचायत मध्ये २७ मे २०२२ रोजी पेसा समन्वयक यांच्या समोर विषयाची उजळली करण्यात आली. मात्र ३१ मे रोजी कोणतीही पूर्व कल्पना न देता लिलाव नोटीस काढून बाहेरील लोकांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महिला महासंघाचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे गावातील महिलांना तलावाचे मूल्यांकन करून पेसा नियमा अंतर्गत प्राधान्य द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी पी. डब्लु. कुळसंगे, सविता कनाके, यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.