आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी मंत्रालय:शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शांततेत, 25 मिनिटांच्या चर्चेत 56 विषय मंजूर

यवतमाळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेची शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा बुधवार, दि. १६ मार्च रोजी पार पडली. सभेच्या सुरवातीलाच विषय पत्रीकेवरील ५६ विषयाचे वाचन करण्यात आले. तद्ंतर सर्व विषयाला अवघ्या २५ मिनिटात सर्वानुमते मंजूरात देण्यात आली. एकूण ३५ मिनिटात जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली.

विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. अशात बुधवार, दि. १६ मार्च जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. या सभेत विषय पत्रिकेवर एकूण ५६ विषय होते. यात सर्वाधिक वित्तीय विषयाचा समावेश होता. तर जून महिन्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील जवळपास ३१ आर्थीक विषय आयुक्तांनी रद्द केले होते. ते विषयसुद्धा ह्या सभेच्या विषय पत्रिकेत मंजूरी करीता ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने सभेला सुरूवात झाली.

सभेच्या सुरवातीलाच एकूण ६५ विषयाचे वाचन करण्यात आले. या विषयावर सविस्तर चर्चा अपेक्षीत होती. त्या अनुषंगाने पंचायत समितीत बसून असलेल्या काही सदस्यांनी मत मांडले. तर काही सदस्य इतर विषयावर चर्चा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, विशेष सर्वसाधारण सभा असल्यामुळे इतर कुठल्याही विषयावर चर्चा करता येणार नसल्याचे अध्यक्ष, सचिवांकडून सांगण्यात आले. अशा परिस्थितीत वाचन झालेल्या ५६ विषयाला सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांनी सर्वांनुमते मंजूरी दिली. या मंजुरीनंतर लगेच सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. एकंदरीत २५ मिनिटापर्यंत विषयावर चर्चा पार पडली आणि ३५ मिनिटात सभा संपल्याने विविध चर्चेला उधाण आले होते.

अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास : जिल्हा परिषदेची शेवटची ऑनलाईन सर्वसाधरण सभा चांगलीच गाजणार असल्याची बोलल्या जात होते. त्या अनुषंगाने विरोधकांनी कंबर सुद्धा कसली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली होती. बुधवारी दुपारी सभेला सुरूवात झाली. आणि अवघ्या ३५ मिनिटात सभा आटोपल्याने अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. सभा आटोपल्याचे सांगताच अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

जिल्हा परिषदेची १० जून २०२१ च्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत येणाऱ्या विषयाला आयुक्तांनी स्थगिती येण्यापूर्वीच ह्यातील बहुतांश ठरावानुसार कामांना सुरूवात झाली. आजघडीस कामे पूर्ण झाले असून, देयकेसुद्धा अदा झाले. त्यामुळे यापूर्वीच्या सभेत विषय ठेवण्यात आले नव्हते, परंतू हा विषय अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन बुधवार, दि. १६ मार्च रोजी शेवटच्या सभेत ते २४ ठराव पुन्हा ठेवून मंजूर करून घेण्यात आले. यावरून अधिकाऱ्यांनी स्वत: अंग काढून घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.

वित्तीय, धोरणात्मक विषयांना मंजुरी
कोविड-१९ च्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेला नियमानुसार कोरम पूर्ण होता. सभेच्या विषय सुचीनुसार एक ते ५६ विषयाचा समावेश होता. सभेत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास विषयक कामांना तसेच प्रशासनिक, वित्तीय व धोरणात्मक विषयांना मंजुरी देण्यात आली. कालिंदा पवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ.

सभा आटोपल्यानंतर कक्षात बसून असलेले पदाधिकारी.
शिक्षणचा तो ठराव घेतलाच नाही : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आठ लाख रूपये शिल्लक होते. ह्या शिल्लक निधीतून वर्ग खोली डिजिटल करण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, येणाऱ्या विषयात हा ठराव घेण्यात आला होता. भविष्यात अडचणी निर्माण होईल, म्हणून हा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला नाही.

बातम्या आणखी आहेत...