आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:घरफोडीतील चोरट्यांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरफोडी प्रकरणातील दोघांना अटक करण्यात एससीबी पथकाला यश आले असून त्या दोघांकडून चोरीतील मोबाईल आणि कॅमेरा जप्त करण्यात आला आहे. त्या दोघांनाही एलसीबी पथकाने पुढील तपासाकरीता नेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अतुल राजु चांदेकर रा. हिवरा कावरे ता. देवळी जि. वर्धा ह.मु. यवतमाळ आणि शेख समीर शेख इसराईल रा. बेंडकीपुरा, यवतमाळ अशी त्या दोघांची नावे आहे.

नेर शहरात महिन्याभरापूर्वी चोरीची घटना घडली होती. या चोरट्यांचा शोध नेर पोलिसांसह एलसीबी पथकाने सुरू केला. अश्यात गुरूवारी या प्रकरणातील एका संशयित आरोपीबाबतची माहिती एलसीबीतील पोलिस उपनिरीक्षक सागर भास्कर यांना मिळाली होती. त्यावरून शहरातील बेंडकीपूरा येथील शेख समीर शेख इसराईल याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली. यावेळी चोरीतील मोबाईल अतुल चांदेकर व इतर एक मोबाईल त्याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. दरम्यान एलसीबीले अतुल चांदेकर याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...