आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरखेड सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांवरून आगामी निवडणुकीत काँग्रेस आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. लवकरच जिल्हाभरात हातसे हात जोडो यात्रा संपूर्ण जिल्हाभर राबवण्याचा संकल्प जिजाऊ भवन येथे झालेल्या विधानसभा आढावा बैठकीत जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाकडून करण्यात आला. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला देशात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाभर हातसे हात जोडो यात्रा काढण्याचा संकल्प जिल्हा नेतृत्वाने बैठकीत केला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व निवडणुकीसाठीचा अॅक्शन प्लॅन तयार करून जिल्हाभर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने उपाय योजनेवर आढावा घेण्यात आला.
सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून, फक्त गुजरातधार्जीने निर्णय घेण्यात व्यस्त असल्याने आता काँग्रेसच जनतेला भेडसावणाऱ्या भारनियमन, वीजबील माफी, शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत, वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, सरसकट पीकविमा आदी विषयांवर रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याचे काम करेल, असे सांगण्यात आले. या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, तातू देशमुख, राम देवसरकर, प्रवीण देशमुख, मनीष पाटील, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, महेंद्र कावळे, दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल, शिवाजीराव देशमुख, गोपाल अग्रवाल, शैलेश कोपरकर, कृष्णा पाटील देवसरकर, बाळासाहेब चंद्रे, रक्षा माने, माला देशमुख, चंदाबाई पाईकराव, सुनीता घोडे, ख्वाजाभाई, जाणी भाई, बाबू हिना, सोनू खतीब, तालीब शेख, जमीर पेंटर, शिवाजी वानखेडे, चरण डोंगरे, प्रभाकर कदम, सिद्धू जगताप, भय्या पवार, प्रेमराव वानखेडे, युवराज देवसरकर, इश्वर गोस्वामी तसेच उमरखेड, महागाव तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.