आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉकीचे खेळाडु घडवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या व्यक्तींचा नुकताच जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडु तसेच आकाश चिकटे स्पोर्ट अकॅडमीचे सचिव आकाश चिकटे यांनी पुढाकार घेतला असून गरजू खेळाडूंना साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे हॉकी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन हॉकी खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्या नवीन खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांना घडवण्याकरिता जे अथक परिश्रम घेतात, अशा व्यक्तींचा सत्कार आकाश चिकटे स्पोर्ट अकॅडमी तर्फे जीवन गौरव पुरस्कार देवुन करण्यात येतो. या वर्षी पुरस्काराचे मानकरी अजय शेकदार ठरल्याने त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्याच बरोबर शिबिरामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार खेळाडूंना प्रदान करण्यात आले. यात रोचक भगत याला अपकमींग प्लेअर ऑफ द समर कॅम्प, तनुश्री कडु हिला प्लेअर ऑफ द समर कॅम्प, प्रथमेश ठोकळ याला प्लेअर ऑफ द समर कॅम्प, सौरभ तांदुळकर याला मोस्ट प्रॉमीसींग प्लेअर ऑफ द समर कॅम्प आदी पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच गरजू खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी खेळाडुंच्यावतीने चंद्रपूर येथील सुषमा खाडे, यवतमाळ येथील सानिका भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच क्रीडा शिक्षक नीलेश भगत, अविनाश जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज इंगोले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला. उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिर उत्साहात... आकाश चिकटे स्पोर्ट अकॅडमी अंतर्गत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिर दि. १८ मे ते दि. २८ मे या कालावधीत घेण्यात आले. उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला आकाश चिकटे स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष मनोज इंगोले, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तसेच संस्थेचे सचिव आकाश चिकटे, देवेंद्र चपेरीया, अविनाश जोशी, भगत सर उपस्थिती होते समारोपीय कार्यक्रमामध्ये अकॅडमीचे कोच आकाश चिकटे व पुजा आकाश चिकटे यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगोले यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरामध्ये मंबई, पुणे, नागपुर, नंदुरबार, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ व यवतमाळ ग्रामीण या शहरातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.