आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:जवळा बसस्थानकावर झालेल्या वादातून त्या लाईनमनची हत्या

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील जवळा बसस्थानकावर झालेल्या वादातून गजानन राठोर या खाजगी लाईनमनची भोयर परिसरात दगडाने वार करीत हत्या करण्यात आल्याची कबूली मारेकऱ्याने पोलिसांसमोर दिली. शनिवार, दि. ३ सप्टेंबरला अवधुतवाडी पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले. सुरज सोनबाजी बोरकर वय ४२ वर्ष रा. चापडोह असे मारेकऱ्याचे नाव असून त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

यवतमाळ तालुक्यातील चापडोह येथील सुरज बोरकर आर्णी तालुक्यातील लोणी येथील सासरवाडीला पत्नीसह मुलांना भेटण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणाहून परत गावाकडे येण्यासाठी दि. ३० ऑगस्टला सुरज दुचाकीने निघाला होता. रात्री उशिर होत असल्याने तो जवळा येथील बसस्थानकावर झोपला. यावेळी गजानन राठोर याने सुरज सोबत वाद करीत शिविगाळ केली. त्यामूळे सुरज दुचाकी घेवून यवतमाळकडे निघाला. अश्यात गजानन याने सुरज याची कॉलर पकडत यवतमाळात घेवून चाल असे म्हणाला. त्यानंतर दोघेही रात्रीच्या सुमारास भोयर परिसरातील मोचन धाब्याजवळ सुरज बोरकर याने गजानन राठोर याची हत्या केली.

बातम्या आणखी आहेत...