आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामारेगाव भूमी अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त असून ऐका टेबलावर चार टेबलाचा कारभार दिल्याने कामे प्रभावित झाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे ऐक ना भाराभर चिंध्या असा अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयात जागा रिक्त असल्याने या कार्यालयातील कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात एकूण वीस पदे असून आठ पदे रिक्त आहे त्या पैकी ऐका महिला लिपिकाच्या टेबलवर चार टेबलाच्या भार असल्याने त्यांनाही काम करणे अवघड होत आहे.फेरफार टेबल ज्यांच्याकडे आहे. त्यांना आता मोजणीचे काम असल्याने आखीव पत्रिका फेरफार नकाशे वेळेवर होत नाही ऐका नकाशा आखीव पत्रिकेसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. मोजणी प्रकरणे वाटपाचे काम ज्यांच्या कडे आहे त्यांना देखील मोजणीचे काम दिल्या गेले आहे.त्यामुळे कार्यालयातील अनेक कामे प्रभावित आहे. या कार्यालयाचे उपअधीक्षक हजर नसल्याने उपअधीक्षक प्रभरावरच आहे .आणि आठवड्यातून एकच दिवस हजर राहतात त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे कामे प्रभावित झाली आहे. या भूमी अभिलेख कार्यालयात संपूर्ण रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.