आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीची कारवाई:चार तालुक्यातील मटक्याची खायवाडी करणारे वणीतील मुख्य केंद्र उद्ध्वस्त

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील चार तालुक्यातील मटक्याची खायवाडी करणारे वणीतील मुख्य केंद्र एलसीबीने उद्ध्वस्त करीत चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली असून चौघांवर गुन्हे नोंद करण्यात आले. शेख अल्ताफ हुसेन मन्सूर हुसेन वय ३५ वर्ष रा. शांतीनगर, अदिलाबाद, दिनेश जयवंत वय ४६ वर्ष रा. तेली फैल, वणी, अक्रम शेख याकूब शेख वय २७ वर्ष रा. पंचशील नगर, वणी आणि एक अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे.

शनिवारी एलसीबी पथकाने वणी, पांढरकवडा, राळेगाव आणि झरी जामणी या चार तालुक्यातील मटक्याची खायवाडी करणारे वणीतील मुख्य केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत एलसीबी पथकाने वरली मटका साहित्य, १२ मोबाईल, रोख रक्कम असा एक लाख ३२ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध गुन्हे नोंद करण्यात आले

बातम्या आणखी आहेत...