आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठ बैल जोडीच्या साज-सामानाने सजली:बैल पोळ्याच्या सणासाठी दिग्रसची बाजारपेठ सजली

दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैलपोळ्याच्या खरेदीला सुरुवात झाली असून शहरातील बाजारपेठ बैल जोडीच्या साज-सामानाने सजली आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवड्या या वस्तू दाखल झाल्याने शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

भारतीय संस्कृती नुसार श्रावणात सण, उत्सवाची उधळण होत असते. नागपंचंमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी याच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्या निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील बाजारपेठेसह दिग्रसमधे सुद्धा मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, आणि घुंगराच्या माळांनी दुकाने सजली आहेत. यामध्ये बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगबिरंगी झुल, घुंगरांचा पट्टा, हिरव्या रंगाची गोंडे, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांच्या माळा, घुंगरांच्या माळा दाखल झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी नटूनथटून सजलेल्या आपल्या सर्जाराजाला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनवलेली दिटमणीही बाजारात दाखल झाली आहे. या सर्व साहित्याची खरेदीसाठी बळीराजाची धडपड सुरू झालेली दिसून येत आहे. तसेच घरी अनेक जण मातीपासून तयार केलेल्या बैलांची पुजा करतात. त्यामुळे मातीच्या बैलांची दुकाने कमान गेट, कच्छी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मानोरा चौक अशा ठिकाणी थाटली असून ही मातीचे बैल खरेदी देखील अनेक जण करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...