आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:होळीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली‎

यवतमाळ‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्ष कोरोनामुळे‎ नागरिकांनी होळी व रंगोत्सव घरी‎ साजरा केला. यंदा पुन्हा होळीचा‎ उत्साह पूर्ववत दिसून येत आहे.‎ अवघ्या २ दिवसांवर आलेल्या‎ होळीसाठी शहरातील मेन लाईन,‎ दत्त चौक, आर्णी नाका, शनि मंदिर‎ चौक या परिसरात होळीसाठी‎ लागणाऱ्या साहित्यांनी दुकाने‎ सजली आहेत. यंदा होळीच्या वस्तू‎ खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला‎ प्रतिसाद मिळत असल्याने‎ बाजारपेठेत उत्साह आहे.‎ निर्बंधमुक्त होळी साजरी‎ करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढला‎ आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होळी म्हणजे नाते जपणारा आणि‎ विविधरंगी रंगांचा सण रंगाची‎ उधळण करणाऱ्या या सणासाठी‎ शहरातील बाजारपेठ सज्ज झाल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेत. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे‎ वर्चस्व होते. पण यंदा भारतीय‎ बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी,‎ गाठींच्या किमतींमध्ये २५ ते ३० टक्के‎ वाढ झाली आहे. हर्बल आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.‎ यंदा जीएसटीमुळे वस्तूंचे भाव‎ वाढले आहे.‎

महागाईने गोड गाठी‎ झाल्या कडवट
होळीचा रंग, गुलालाची उधळण‎ केल्यावर लहान मुलांना‎ साखरेपासून बनवलेली गाठी‎ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे‎ शहरात साखरेच्या गाठी‎ विक्रेत्यांची दुकाने सजली आहे.‎ या दुकानांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या‎ विविध आकाराच्या गाठ्या‎ उपलब्ध आहेत. मात्र, या गोड‎ गाठ्यांवरही महागाईचा प्रभाव‎ दिसून येत आहे.‎

कार्टून्सच्या‎ पिचकाऱ्यांची क्रेझ‎
गेल्या वर्षीपेक्षा यंदा नागरिकांचा‎ प्रचंड उत्साह दिसून येत आहेत.‎ बाजारात विविध प्रकारच्या‎ पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये‎ विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची‎ क्रेझ अधिक आहे. त्यात पब्जी या‎ खेळाची पिचकारी, विविध आवाज‎ साधारण २५० पासून ५००‎ रुपयांपर्यंत बाजारात पिचकाऱ्या‎ उपलब्ध आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...