आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:झाडे लावा झाडे जगवा- पर्यावरणाचे रक्षण करा’चा संदेश

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाजामध्ये वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीकरीता शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हिवरी तथा हिवरी येथील वन विभागाच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून निघालेल्या वृक्ष दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी झाडे लावा झाडे जगवा’ पर्यावरणाचे रक्षण करा’ सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थांसह वनाधिकारी शाळेचे प्राचार्य शैलेंद्र मिश्रा, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व वन कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते. वृक्ष दिंडीच्या समारोपानंतर शाळेत वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपन कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षकांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक शैलेंद्र मिश्रा, विनोद क्षीरसागर, सविता राठोड, भास्कर हंबर्डे, संतोष शेणमारे, दीपाली देशमुख, सारिका हांडे, अनिता खाटकर, रंजना भोयर, भगवान तुमसरे, सुनिता काकपूरे, आशा सावरकर, संगिता कुळसंगे, संजय भुजाडे,निखिल मडावी, कैलास पवार तसेच क्षेत्र सहाय्यक एन. व्ही. तांबारे, वनरक्षक व्ही. सी. कैथवास वन कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...