आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवस ढगाळ वातावरण:दहा अंशांवरील किमान तापमान आले पंधरावर

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या हिवाळ्यात शुक्रवार, दि. ९ डिसेंबर रोजी सर्वाधिक थंडी जाणवली असून किमान तापमान १० अंश नोंदवले गेले. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला असून रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या आठवड्यात पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होऊन सोमवारी किमान तापमानाचा पारा जवळपास ४ अंशांनी वाढला आहे.

जिल्ह्यात ७ ते ११ डिसेंबर दरम्यान गारठा मोठ्या प्रमाणात जाणवला. गतवर्षी डिसेंबर महिन्यात हवेचा वेग कमी असताना १२ अंशांपेक्षा कमी पारा आला नव्हता. मात्र, यंदा पारा १०.७ अंशांपर्यंत खाली घसरून काही प्रमाणात हवेचा वेग होता. यामुळे गारठा अधिक जाणवत होता. शनिवारी वाऱ्याचा वेग कमी झाला होता. परंतु, बोचरी थंडी जाणवत होती. रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली होती. पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या वादळाने ११ ते १५ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच राज्यासह जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी किमान तापमान १५ अंशावर गेल्याने थंडी गायब झाली असून दिवसाचे कमाल तापमान ३८.५ अंशावर होते. नोव्हेंबर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातही प्रत्येक आठवड्यात वातावरणात बदल होत आहे. यामुळे काही दिवसात थंडी व काही दिवस ढगाळ वातावरणाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उकाडा रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाला चांगला असून वाढ जोमात होते.

पावसाची शक्यता, त्यानंतर वाढेल थंडी
राज्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे किमान तापमान वाढले आहे. आगामी काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढेल.डॉ. आशुतोष लाटकर, कृषी संशोधन केंद्र

बातम्या आणखी आहेत...