आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलीसह आईने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.१५ वाजता घडली होती. या मुलीचा महिनाभरानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात वर्षभरानंतर आईने पोटच्या ५ वर्षीय मुलीचा विषारी औषध पाजून खून केला व स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले. ऐश्वर्या जाधव वय ५ असे मृत चिमुकलीचे नाव असून, पूजा संतोष जाधव वय २८ असे खुनाचा गुन्हा नोंद झालेल्या आईचे नाव आहे.
आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे ३१ ऑक्टोबर २०२१ ला सकाळी ५ वर्षीय मुलगी ऐश्वर्या जाधव ही उलट्या करत असल्याने तिला प्रथम आर्णी ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तिच्या पोटात विष गेल्याने तिचा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मृत्यू झाल्याने आर्णी पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल व विकृतीशास्त्र विभागाचा अहवाल प्राप्त झाला.
आई पूजा जाधवने पोटच्या ५ वर्षीय मुलीचा विषारी औषध पाजून खून केला. तसेच स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे प्रथमदर्शी तपासात एक वर्षाने निष्पन्न झाले. त्यावरून आर्णी पोलिसांनी आई पूजाविरुद्ध १८ डिसेंबरला विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि गणपत कालुसे करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.