आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळा येथील ग्रामस्थांनी आपल्याला हक्काचे घरे मिळण्याकरिता माजी उपसरपंच भारत काळबांडे यांच्या नेतृत्वात आर्णी तहसील समोर उपोषण सुरू केले होते. बुधवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जवळा येथील माजी उपसरपंच भारत काळबांडे व सामाजिक कार्यकर्ते अमोल टोपरे यांना उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार परसराम भोसले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. सर्वांसाठी घरे या शासनाच्या योजनेत जवळा येथील ग्रामस्थ अतिक्रमित जागेमुळे वंचित राहिले होते. यासाठी जवळा येथील माजी उपसरपंच भारत काळबांडे व अमोल टोपरे यांनी २ तारखेपासून तहसील कार्यालय आर्णीसमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणात दोन्ही उपोषणकर्त्यांच्या प्रकृती खालावली होती.
तिसऱ्या दिवशी आर्णी येथील तहसीलदार भोसले यांनी उपोषण मंडपात भेट दिली व उपोषणकर्ते यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर तत्काळ, घंटे का काम मिंटो मे, असे म्हणून आदेश पारित करायला आर्णी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आदेश दिले. आर्णी तहसील कार्यालय स्तरावरील अडचणी सोडवण्याचे आदेश देवून भूमी अभिलेख कार्यालयाला अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मोजणी करून शासन निर्णयानुसार प्रयेकड पाचशे स्क्वेअर फुट जागा मोजणी करून द्यावी असे आदेश लेखी स्वरूपात दिले. व तसेच कोणी यापेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केले असेल तर शासन निर्णयानुसार त्याची मोजणी करून शासन दंड भरून त्यांच्या नावावर करून दिली जाइल जर ते गावठाणात असेल तर इतर सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास कारवाई करा असे आदेश दिले.
उपोषणाची सांगता करण्याकरता आर्णी तहसील कार्यालयाचे तहसीलदार आले असता, आर्णी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे या मात्र गैरहजर होत्या सर्व उपोषणकरत्यांचे सर्व प्रश्न हे पंचायत समितीशी निगडीत असल्याने तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी सुट्टी वर आहे असे उत्तर दिले. त्यामुळे तहसीलदार भोसले यांच्यासह माजी आमदार बेग, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी उपोषणाची सांगता केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.