आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनतळ:बहुप्रतीक्षीत नाट्यगृह प्रशस्त, वाहनतळ मात्र मर्यादित

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे दोन तपांपासुन प्रलंबित असलेला जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचा तिढा आता काहीसा मार्गी लागला आहे. मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या प्रशस्त अशा नाट्यगृहाच्या परिसरात वाहनतळासाठी मात्र मर्यादीत जागा शिल्लक ठेवण्यात आल्याचे दिसुन येते. त्यामुळे नाट्यगृह सुरु होण्यापुर्वी वेळीच वाहन तळाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

शहरातील गार्डन मार्गावर प्रशस्त असे नाट्यगृह तयार करण्याचे काम सुमारे २० वर्षांपुर्वी हाती घेण्यात आले होते. सध्या नाट्यगृह सुरू करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी असलेली पेंडींग कामे पूर्णत्वास नेण्यात येत आहेत. कामे जोमात सुरू असल्याने येत्या काही महिन्यात नाट्यगृह पुर्णपणे सज्ज होण्याची शक्यता आहे.

१ हजारांपेक्षा अधीक आसनक्षमता असलेल्या या भव्य नाट्यगृहाची पायाभरणी झाली होती. मात्र इतक्या मोठ्या आसन क्षमतेच्या नाट्यगृहात येणाऱ्या मायबाप रसिकांना त्यांची वाहने ठेवता यावी यासाठी त्याच प्रमाणे प्रशस्त असे वाहनतळ या परिसरात आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र मर्यादीत प्रमाणात वाहनतळ नाट्यगृह परिसरात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नाट्यगृहात एखादा प्रयोग खचाखच भरलेला असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना वाहने उभी करण्यासाठी ही उपलब्ध सुविधा फार कमी पडेल असे जाणकारांचे मत आहे.

चारचाकी वाहनांची वाढतेय संख्या
गेल्या काही वर्षात सर्वत्र चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य माणसेही आता चारचाकी कार वापरत आहेत. अशा स्थितीत नाट्यगृहात एखादा लोकप्रिय प्रयोग आल्यास त्यासाठी येणारे प्रेक्षक मोठ्या संख्येने चारचाकी वाहने घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत दरवेळी वाहनांच्या पार्किंगची समस्या उद्भवु शकते. त्यामुळे त्यासंदर्भात आत्ताच योग्य नियोजन आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...