आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस तपास:अखेर खुनातील मृताची ओळख पटली; पांढरकवडा मार्गावरील खून, मृत पिंळगावातील

यवतमाळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्याभरापूर्वी शहरातील पांढरकवडा मार्गावर एका अनोळखी युवकाची दोघांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. मात्र मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. अखेर शनिवारी त्या मृताची ओळख पटली असून तो पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगरातील असल्याचे निष्पन्न झाले. रवी कुंडलीकराव ढोंगे वय ३८ वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे.

शहरातील पांढरकवडा मार्गावर एका युवकाची विवस्त्र करीत दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना गेल्या महिन्यात घडली आली असून पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले होते.शेख शकील शेख हकीम वय ३३ वर्ष रा. इंदिरा नगर आणि शेख सुदाम शेख रहेमान वय २७ वर्ष रा. रूबानी ले-आऊट, यवतमाळ अशी त्या दोघांची नावे आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी मृत युवकाबाद्दल विचारपूस केली. मात्र कुठलिही माहिती त्या दोघांकडून समोर आली नव्हती.

त्यानंतर शहर पोलिसांनी शोध पत्रिका जाहीर करीत त्या युवकाची ओळख पटवण्यास सुरूवात केली. अश्यात शुक्रवारी एक युवक काही कामानिमीत्त कळंब पोलिस ठाण्यात गेला असता, त्याला त्या ठिकाणी शोध पत्रिका दिसली. त्यातील मृत रवि ढोंगे असल्याचे त्याच्या लक्षात आले.

म्हणून हरवल्याची तक्रार नाही
पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगरात रवी ढोंगे हा कुटूंबीयासह राहत असून मजूरीचे काम करीत होता. त्याच्यासोबत पत्नी आणि दोन मुले राहत होती. रवि मद्यप्राशन करण्याच्या सवयीचा असल्याने नेहमी कुटूंबीयांसोबत वाद करीत होता. यापूर्वी बऱ्याच दा अश्याच प्रकारे आठ-आठ, दहा-दहा दिवस घरून बेपत्ता राहत होता. यावेळी अश्याच पध्दतीने तो बेपत्ता झाला असल्याचा अंदाज कुटूंबीयांना आला. त्यामूळे त्यांनी पोलिसात तक्रारच दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...