आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार अर्थातच आंबेडकरवाद खऱ्या अर्थाने रुजवण्याची आज गरज आहे. आज समाजाचा वापर राजकीयदृष्ट्या केला जात असून आंबेडकरवाद सामान्यांमध्ये रुजवण्याकरिता आता सांस्कृतीक आंदोलनाची गरज आहे, असे विचार सेवानिवृत्त आयएएस अधिकारी रमेश थेटे यांनी पौर्णिमा कला अकादमी येथे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी रवींद्र वानखडे यांनी रमेश थेटे व त्यांच्या पत्नी मंदा थेटे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला. या वेळी रवींद्र वानखडे यांनी संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी रमेश थेटे यांनी आज समाजातील बदलत असलेले चित्र अत्यंत क्लेशदायक आहे. ज्यांनी संपूर्ण देशासाठी आपले आयुष्य खर्ची घातले, अशा महापुरुषांचे विचार दाबण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून केला जात आहे. आपल्या बहुजनवादी विचाराच्या नागरिकांनी या बाबी समजून घेत सांस्कृतीक आंदोलनाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार तेवत ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले. या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत समुह गीताने करण्यात आले. सूत्रसंचालन प्रभाकर मोहोड, तर आभार प्रिया वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.