आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा ह्या दृष्टीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या अध्यक्षतेखाली न्यू मॉडूल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बळीराजा चेतना भवन येथे रविवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यात विविध लाभार्थ्यांसाठी स्टॉल सुद्धालावण्यात येणार आहे.
सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशूसंवर्धन ह्या विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा केल्या जाते, परंतू बऱ्याच वेळा जनजागृती अभावी लाभार्थी लाभापासून वंचित आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या वतीने न्यू मॉडूल कॅम्पचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दि. १३नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता बळीराजा चेतना भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.