आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीस अडचण:वर्दळीच्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाने‎ केलेला खड्डा ठरतोय जीवघेणा‎

पुसद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डूब्बेवार ले-आऊटकडे जाणाऱ्या‎ रस्त्याच्या मधोमध दोन महिन्यापूर्वी मुख्य नळ‎ वाहिनीमध्ये लिकेज असल्यामुळे तो लिकेज दूर‎ करण्यासाठी खूप मोठा खड्डा करण्यात आला होता.‎ परंतू दोन महिने उलटून सुद्धा ती नळ वाहिनी‎ अजूनपर्यंत दुरुस्त झाली नाही. तिथे केलेला खूप‎ मोठा खड्डा हा वाहतुकीस अडचण निर्माण करत‎ आहे. समोरच रस्त्याचे काम चालू आहे. त्या‎ रस्त्याच्या कामांमध्ये चारी बाजूने गिट्टी टाकल्यामुळे‎ वाहतूकीची प्रचंड प्रमाणात कोंडी होत आहे.‎ दिवाळी पूर्वी भर रस्त्यात खोदलेला हा खड्डा‎ अजूनही नादुरुस्त अवस्थेतच आहे.

या रस्त्यावर‎ दवा बाजार असल्याने दररोज प्रचंड प्रमाणात‎ वाहतूक चालत असते. दवाबाजारमुळे मोठे‎ वाहन व छोटे वाहन या रस्त्यावर चालतात. त्यामुळे‎ अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्या खूप‎ मोठ्या खड्ड्यांमुळे चौकामध्ये अनेक छोटे मोठे‎ अपघात होत आहेत. वाहतुकीला खूप अडचण‎ निर्माण होत आहे. खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर‎ टाकलेली गिट्टी उडून नागरिक गंभीर जखमी‎ होण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासनाने याच्याकडे‎ लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांची‎ अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा खड्डा‎ बुजवावा व ठेकेदाराकडून लवकरात लवकर रस्ता‎ तयार करण्यात यावा. हा रस्ता व खड्डा तयार‎ करण्यातस विलंब का होत आहे. या बाबत‎ वरीष्ठांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई‎ करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...