आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रीक बीघाड:महिनाभरातच तारांगण पडले बंद

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंतराळात घडणाऱ्या विविध घटना, अंतराळाबाबतची शास्त्रीय माहिती लहान मुलांना सोप्या पद्धतीने कळावी या उद्देशातून शहरातील आझाद मैदानात असलेल्या नेहरु उद्यान परिसरात तारांगणाची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसात आलेल्या तांत्रीक बीघाडानंतर सुमारे आठ महिन्यांपासून हे तारांगण बंद पडले आहे. देयके रखडल्याचे कारण पुढे करुन संबंधीत ठेकेदाराकडून काम पुर्ण करण्यात येत नसल्याचा फटका बसुन तारांगण बंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र त्यामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च निरर्थक ठरत आहे.या तारांगणाचे भुमी पुजन १५ ऑगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर तारांगणाचे लोकार्पण तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले होते. २६ फेब्रुवारी २०२२ पासुन हे तारांगण खुले करण्यात आले. काही शोनंतर मशिनमध्ये बिघाड झाल्याने तारांगण बंद झाले.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांचा हीरमोड शहरात एकही पर्यटनस्थळ नसल्याने तारांगण लहान मुलांसह मोठ्या नागरिकांनाही विरंगुळा ठरणार होते. घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवता यावे असे शहरातील एक स्थळ तारांगण आहे. मात्र ते बंद असल्याने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चिमुकल्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

अॅडव्हेंचर कॅम्पही बंद
तारांगणाच्या समोरच्या भागात लहान मुलांसाठी अॅड व्हेंचर पार्क तयार करण्यात आले होते. त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र हे अॅड व्हेंचर पार्कही तारांगणाप्रमाणे बंद पडले आहे. यासंदर्भात लवकर कारवाई करुन तारांगण आणि अॅड व्हेंचर कँप सुरू करण्याची मागणी आता होत आहे.

काही दिवसात यावर तोडगा निघण्याची शक्यता
अकोला येथील एका कंत्राटदाराने तारांगणाचे काम केले आहे. त्यांचे बरीच देयके अदा केली आहे. उर्वरीत देयकांसाठी ते काम करण्यास नकार देत आहे. काही दिवसात यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दादाराव डोल्हारकर, मुख्याधिकारी, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...