आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिभा असतानाही समोर येणाऱ्या काही अडचणींमुळे अनेक प्रतिभावंत अपेक्षीत यशापासून दूर राहतात. सर्वच क्षेत्रात आढळून येणारी ही अडचण यवतमाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हेल्थ मॅरेथॉनदरम्यान जाणवली. मात्र यावेळी संयोजन समितीच्या सदस्यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे पंधरा प्रतिभावंत खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. इतकेच नव्हे तर पंधरा पैकी तब्बल सात जणांनी स्पर्धेत पारितोषिकही पटकावले.
अंगी प्रतिभा असतानाही केवळ आर्थीक अडचणींमुळे अनेक प्रतिभावंतांना आपली प्रतिभा सिद्ध करुन दाखवता येत नाही. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अशा प्रकारचे प्रतिभावंत परिस्थितीपुढे गुढगे टेकवताना दिसतात. मात्र काही प्रतिभावंतांना आवश्यकतेच्या वेळी कोणाची तरी मदत मिळते आणि त्या मदतीच्या जोरावर ते मिळालेल्या संधीचे सोने करतात. असाच काहीसा प्रकार नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन दरम्यान आढळुन आला.
स्पर्धेत या खेळाडूंनी पटकावली पारितोषिके खेळाडूंची नावे किलोमिटर क्रमांक प्रिती ढाकरगे ५ किमि ३ री रिना मेश्राम १० किमी २ री काजल दोनोडे ३ किमी २ री गौरी पेंदोर ३ किमी १ ली अवंतीका वासनीक १० किमी ३ री अभिजीत नाचपेलवार ५ किमी ३ रा सोनल वानखडे ५ किमी २ रा आम्ही केवळ संधी दिली, मेहनत खेळाडूंचीच
यवतमाळ शहरात चांगल्या दर्जाचे धावक आहेत. काही वेळा आर्थीक अडचणी वरचढ ठरतात.अशाच काही खेळाडुंची माहिती मिळाली.केवळ परिस्थितीमुळे चांगले धावक मॅरेथॉनपासुन मुकु नये यासाठी संयोजन समितीच्या सदस्यांनी त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.या खेळाडूंना आम्ही फक्त संधी दिली,मात्र त्यांच्या मेहनतीमुळेच त्यांनी संधीचे सोने केले. - डॉ.शरद राखुंडे,सचिव, आयएमए,यवत माळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.