आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांचे हाल‎:मारेगाव येथील ग्रामीण‎ रुग्णालयात पिण्याच्या‎ पाण्याअभावी रुग्णांचे हाल‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज‎ शेकडो रुग्णांसह लोकांची वर्दळ‎ असते; परंतु रुग्णालयाकडून‎ पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय‎ होत नाही. सकाळी भरलेले पाणी‎ काही तासांतच संपल्यावर पुन्हा‎ पाण्याचा पत्ता नसतो, अशी नेहमी‎ ओरड असते. त्यामुळे रुग्णालय‎ प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची‎ पुरेशी व्यवस्था करावी, अशी‎ मागणी रुग्णांसह नागरिकांकडून‎ केली जात आहे.‎

या रुग्णालयात दररोज‎ तालुक्यातील विविध ठिकाणांहून‎ नागरिकांची ये-जा सुरू असते.‎ मात्र,पाणी मिळत नसल्याने त्यांना‎ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत‎ आहे. तसेच अनेक रुग्ण हे या‎ रुग्णालयात एकटेच उपचार‎ घेण्याकरिता येत असतात.‎ त्यांनाही अंगावर आजार घेऊन‎ पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत‎ आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने‎ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन‎ ग्रामीण रुग्णालयात पाण्याची‎ व्यवस्था करावी, अशी मागणी‎ होत आहे. रुग्णांप्रमाणेच येथे‎ येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची‎ देखील तारांबळ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...