आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासाची दुरुस्ती:मंगरूळपीर येथील पोलीस निवासाची दुरुस्ती करावी

मंगरूळपीर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरूळपीर येथील पोलीस निवासाची गेली अनेक वर्षांपासून झालेली पडझड पाहता नवीन पोलीस वसाहत बांधकाम करावी अशी मागणी संजू आधार वाडे विचार मंचच्या वतीने दि १७ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारें करण्यात आली आहे

मंगरुळपीर येथील पोलीस निवास बांधकामे गेली अनेक वर्षांपूर्वी कौलारू पद्धतीची असून ती पूर्णतः जीर्ण झाली आहेत. अनेक घरे निकामी झाली आहेत. त्यामुळे पोलिसांना राहण्यासाठी घरे उपलब्ध नाहीत. ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन पोलीस स्टेशनलगत असलेल्या पोलीस निवासाची तात्काळ दुरुस्ती करावी किंवा मंगरुळपीर पोलीस स्टेशन आवारात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत सदर जागेत पोलीस वसाहत बांधकाम करण्यास मोठा वाव आहे पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळाल्यास त्यांना राहण्यास सुविधा होऊन त्यांचे मनोबल वाढेल.

ही बाब लक्षात घेऊन मंगरुळपीर जि.वाशिम येथील मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीच्या जागी नवीन पोलीस वसाहत बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी संजू आधार वाडे विचार मंचने केली आहे या निवेदनावर नाना देवळे,अश्विनी अवताडे, सामाजिक कार्यकर्ते युनूस खान,शेख नवेद,संतोष चव्हाण, समीप हवा,यासह शेकडो नागरिकाच्या स्वाक्षऱ्या आहेत

बातम्या आणखी आहेत...