आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला होता. अशात सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदुर पावसाने हजेरी लावली, परंतू मंगळवार, दि. २६ जुलै रोजी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. मात्र, दिवसभर अधून मधून पाऊस पडत होता. तर सलग पडणाऱ्या पावसाने दारव्हा तालुक्यातील अडाण धरणाचे पाच गेट ४० सेबीने उघडण्यात आले असून, ह्यात २२२ घमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी पात्रा लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
ढाणकी
गेल्या दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मंगळवार, दि. २६ जुलै रोजी आटरीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ढाणकी बिटरगाव रस्त्याला सोडणाऱ्या पुला वरून पुराचे पाणी वाहू लागल्याने करंजी, बिटरगाव, जेवली, पिंपळगाव, मुरली आदी गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. बऱ्याच वेळापर्यंत वाहतूक ठप्प होती. तर शेत शिवारात पाणी घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कुपटा नदीवर पूर परिस्थिती
दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.या नदीवर पुल आहे. मात्र, थोड्याशा पुराने पूल पाण्याखाली गडप होतो. त्यामुळे नागरिकांना नदी वरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जावे लागते. बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेला तब्बल ४ ते ५ फुटांचा (गॅप) ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून उडी मारावी लागत आहे. हातणी गावातील विद्यार्थी दारव्हा येथील शाळांमध्ये शिक्षण घेतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.