आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:ढाणकी परिसरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरी, बळीराजाला उभारी

ढाणकीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या पावसाच्या उघडीपमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजाला उभारी मिळाली. पावसाअभावी रखडलेल्या पेरणीला सुरूवात झाली असून, खरीप हंगामाची लगबग सुरू आहे.

पीककर्ज उसनवारी करून शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बि-बीयाणे खरेदी केली. मात्र, मान्सूनच्या पावसाने ढाणकी परिसरात हुलकावणी दिली. पुरेशा पावसाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी जमिनीत बी टाकणे धोक्याची घंटा समजली. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागामोलाची बि-बीयाणे, रासायणीक खते वापर पेरणीसाठी केला. पाउस रुसला तर दुबार पेरणी सारख्या संकटाला सामोरे जावे लागेल.

या भितीपोटी पुरेसा पावसाची प्रतीक्षा केली. ढाणकी परिसरातील आकोली, करंजी, सावळेश्वर, मन्याळी, बिटरगाव, पिंपळगाव, गांजेगाव, मेट, खरूस आदी ग्रामीण भागातील ढाणकी परिसरातील शेतकरी कापूस, तूर, मुग, उडीद, हळद लागवडीसाठी सक्रीय झाले आहे. तिफनीवर सोयाबीन पिकांची पेरणी जोमाने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात पेरणी केली. त्यांची पीके वर आली, परंतू मोठ्या प्रमाणात चूक झाली आहे. तो पूर्ण करण्यासाठी बळीराजा कुटुंबातील लहान थोरांना घेवून शेतीचे कामे करण्यात व्यस्त आहे.