आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे काम कासवगतीने:रिसोड शहरात वाहतूक‎ कोंडीचा प्रश्न कायमच‎

रिसोड‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिसोड वाशीम जिल्ह्याची राजकीय‎ राजधानी. मात्र, आता ही राजधानी‎ धुळीच्या विळख्यात सापडली आहे.‎ वाहतूक कोंडीने रिसोड शहरातील‎ नागरिक बेजार झाले आहेत.‎ वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन‎ ये-जा करावी लागत आहे.‎ रिसोड शहरातील बसस्थानक ,‎ वाशीम नाका, मालेगाव नाका हा रस्ता‎ वर्दळीचा असून, या रस्त्यावर मोठ्या‎ प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.‎ रस्त्याचे काम कासवगतीने सुरू‎ असल्यामुळे वाहनचालकांना नाहक‎ त्रास सहन करावा लागत आहे.‎ या रस्त्यावर नेहमी वाह तूक कोंडी‎ होत असल्यामुळे नागरिकांची गैॅरसोय‎ होत आहे.

त्यामुळे वाहतूक‎ पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे‎ आहे. रिसोड शहरातील वाशीम नाका‎ ते मालेगाव नाका या रस्त्यावर अनेक‎ महाविद्यालये असून, विद्यार्थ्यांना याच‎ रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. मात्र‎ वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे हाल‎ होत आहेत.‎ या रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र हे‎ काम दर्जेदार पद्धतीने होत नसल्याची‎ तक्रार नागरिकांतून केली जात आहे.‎

तसेच सुरू असलेले काम ही बंद‎ पडेल या भीतीने कोणी बोलत नाही.‎ संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी या‎ कामाकडे लक्ष देत काम दर्जेदार‎ होण्यााठी निर्देश द्यावे, अशी मागणी‎ रिसोड शहरातील नागरिकांतून केली‎ जात आहे.‎ गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे‎ काम सुरू असून रस्ता अजूनही अपूर्ण‎ आहे. शहरासह तालुक्यातील रस्त्याचे‎ काम ही सुरू आहे. शहरातील‎ सिव्हिल लाईन रस्त्याचे काम देखील‎ अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे‎ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास‎ सहन करावा लागत आहे. रस्त्याचे‎ काम अपूर्ण असल्यामुळे शहरातील‎ नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा‎ त्रास होत असून अनेक व्यापाऱ्यांना‎ आपल्या दुकानातील महागड्या‎ वस्तूंवर धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे‎ नुकसानीचा देखील सामना करावा‎ लागत आहे.‎

रिसोड शहरातील रस्त्याची दुरुस्ती‎ व्हावी याकरिता सामाजिक संघटना‎ तसेच विविध पक्षांनी पुढाकार घेतला.‎ रस्त्याचे काम सुरू झाले परंतु रस्त्याचे‎ काम अतिशय कासव गतीने सुरू‎ असल्यामुळे रिसोड शहरातील‎ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात‎ त्रास होत असून रिसोड शहरातील‎ नागरिक आता वाहतूक कोंडीने बेजार‎ झाले आहेत. तरी रस्त्याच्या कामाची‎ गती वाढवून तातडीने हा रस्ता व्हावा‎ असे मागणी यावेळी शहरातील‎ नागरिक करीत आहेत. कालूशा‎ बाबा ते वाशीम नाका या सिव्हिल‎ लाईन रस्त्याचे काम पूर्ण झाले, परंतु‎ डिव्हायडर अजूनही अपूर्ण‎ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात‎ वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...