आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाली:शहरातील 28 प्रभागांतील समस्या आता प्रभागातच निघणार निकाली

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना त्यांच्या समस्या सांगण्यासाठी पालिका कार्यालयात येण्याची गरज भासु नये आणि त्यांच्या तक्रारी परिसरातच निकाली निघाव्यात यासाठी पालिका मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरातील २८ प्रभागांसाठी २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मदतीसाठी २८ सहाय्यक नोडल अधिकारीही देण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी दरदिवशी सकाळी आपल्याकडे जबाबदारी असलेल्या प्रभागामध्ये हजर राहुन नागरिकांच्या समस्या ऐकुन त्या निकाली काढण्याचे काम करणार आहे.

नागरिक परिसरातील कुठलीही अडचण सर्वप्रथम स्थानिक नगर सेवकांच्या कानावर टाकतो. नगरसेवकाने त्या तक्रारीची दखल घेतली नाही तर या नागरिकांना त्या अडचणी पालिका कार्यालय गाठून मुख्याधिकाऱ्यांकडे मांडाव्या लागतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. पालिकेमध्ये प्रशासक कार्यरत असुन शहराची जबाबदारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आली आहे.

अशा स्थितीत नागरिकांना त्यांच्या कुठल्याही लहान-मोठ्या अडचणी सांगण्यासाठी पालिका कार्यालयात यावे लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेता नागरिकांच्या लहान-मोठ्या अडचणी आणि तक्रारी या त्यांच्या परिसरातच मार्गी लागाव्या या उद्देशाने पालिका मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरातील २८ प्रभागांसाठी २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह २८ सहाय्यक नोडल अधिकारीही नियुक्त केले आहे. या नोडल अधिकाऱ्यावर त्या प्रभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नोडल अधिकाऱ्याने दरदिवशी सकाळी संबंधीत प्रभागात उपस्थित राहुन त्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी ऐकुन घ्यायच्या आहेत. सोबतच त्या तक्रारी निकाली काढण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पालिकेच्या संबंधीत विभागाशी संपर्क करायचा आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी प्रभाग १ ते २८ साठी अनुक्रमे पुढील नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यात एम. टी. मिश्रा, दर्शन श्रीवास्तव, संजय हरणखेडे, अनील जिरापूरे, मिलींद घुले, गजानन वातीले, निखील पुराणिक, कांचन मेश्राम, मिन्हाज मुमताज अली खान, शेख कय्युम, गणेश तोटे, अमोल रामटेके, धिरज भोयर, सहदेव पाली, शताक्षी उभाळकर, प्रियंका फुकटे, अर्चना जाधव, राहूल भोयर, अनुप फरतडे, संजय साठे, प्रविण उंदरे, गिरीश गिरटकर, वैशाली पाटील, रोशन चव्हाण, सुनील आजनकर, सुभाष ब्राम्हणे, आषीश लंगोटे, प्रितम देशमुख यांना जबाबदारी देण्यात आली आहे. हे दरदिवशी सकाळी ६ ते ९ संबंधीत प्रभागात राहणार आहे. विशेष म्हणजे अधिकार्‍यांची नावे व फोन नंबर सार्वजनिक करण्यात आले आहे. नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी लागणार आहे. नोडल अधिकार्‍यांना प्रभागातील स्वच्छता, नालेसफाई, कर्मचार्‍यांची उपस्थिती आदीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

नोडल अधिकाऱ्यांचे सकाळचे ३ तास प्रभागासाठी
प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांना दरदिवशी सकाळी ६ ते ९ या वेळेत संबंधीत प्रभागात हजर रहावे लागणार आहे. त्यांचे मोबाइल क्रमांक सार्वजनिक करण्यात आले असुन नागरिकांना त्या क्रमांकावर अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागणार आहे. याशिवाय नियुक्त करण्यात आलेले २८ सहाय्यक नोडल अधिकारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात संबंधीत प्रभागात उपलब्ध राहतील हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...