आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसंपर्क:आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क वाढला

सिंदखेड राजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर पालिकेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याच्या बातम्या १२ मे रोजी झळकल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असून त्यांनी आपाआपल्या भागातील मतदारांचा संपर्क वाढवण्याचा कार्यक्रम सुरु केला असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते.

जिल्ह्यातील जि. प. व पं. स.च्या प्रतिनिधींची मुदत संपलेली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेले अनेक जण तयारीत होते. मात्र राखीव जागा या प्रश्नामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला होता. परंतु, आता निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून हिरमोड झालेल्या इच्छुकांना तरतरी आली आहे. त्यातच सध्या लग्न सराई सुरु असून उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर सुरु केला असला तरी तो एकतर्फी असल्याचे चित्र आहे. विविध प्रसार माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी कशी मिळवता येईल? यासाठी त्या-त्या परिसरातील दुर्लक्षित समस्या शोधून त्यावर उपाययोजना कारणासाठी निवेदने, आंदोलन करण्याचे इशारे देण्यात सध्या ते व्यस्त आहेत.

प्रसिद्धी मिळावी म्हणून साप्ताहिके, दैनिके, यु ट्यूब चॅनेल्स, पोर्टल आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हाताशी धरण्याचे नियोजनही काही उमेदवारांकडून सुरू आहेत. एकंदरीत प्रसार माध्यमातून झळकलेल्या बातमीने राजकीय वातावरणात हालचालींना सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी असा प्राधान्यक्रम देण्याचा उमेदवारांचा मानस असल्याचे सध्या चित्र आहे. निवडणुका पाच महिन्यांनी होणार असल्या तरी, लग्न सराईचा हंगाम लक्षात घेत इच्छुकांनी आपापल्या हालचालींना सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...