आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक शिबिराचा उपक्रम:मोकाट श्वानांच्या पिलांना मिळाली मायेची ऊब

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट श्वानांची पिले त्यांना कुठलेही घर नसल्याने बऱ्याचदा बेवारस फिरत असतात. अशी पिले वाहनांच्या अपघातात किंवा आजारी होवुन दगावतात. अशा पिलांना एखादे घर मिळुन त्यांना मायेची ऊब मिळावी या उद्देशाने शहरातील ओलावा पशुप्रेमी संस्थेच्या वतीने मोकाट श्वानांच्या पिलांसाठी दत्तक शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला. शहरात पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या अशा उपक्रमाला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला हे विशेष.

शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या श्वानांची संख्या मोठी आहे. मिळेल ते खाऊन उघड्यावर असतात. त्यामुळे या पिलांपैकी बरीच पिले आजारी होवुन किंवा रस्त्यावर गाडीखाली येवुन दगावतात. ही बाब लक्षात घेता शहरात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ओलावा पशु प्रेमी संस्थेच्या सदस्यांना एक अभिनव कल्पना सुचली. त्यांनी शहरातील अशा सर्व मोकाट कुत्र्यांचा पिल्लांना एका जागेवर आणून त्यांना पूर्णपणे लसीकरण करून, त्यांना डॉक्टर कडून पूर्णपणे तपासणी करून एका जागी जमा करण्याचे काम सुरू केले.

त्यानंतर या पिलांना हक्काचे घर आणि मायेचा आसरा मिळावा यासाठी मोकाट पिलांसाठी दत्तक विधान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराच्या माध्यमातुन नागरिकांनी अशा मोकाट श्वानांच्या पिलांना घरी न्यावे, त्यांना आश्रय मिळावा व त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे व्हावे हा उद्देश होता. ओलावा संघटनेने शहरातून प्रकारचे श्वानांचे २० पिले जमा केली होती. त्यांना दत्तक देण्यासाठी समर्थवाडी परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक १९ येथे शिबीर आयोजित करण्यात आले. या या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पालिका मुख्याधिकाऱ्यांनीही घेतली दखल
या शिबीरासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी स्वत: या शिबिराच्या ठिकाणी जावुन भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ओलावा संस्थेच्या सदस्यांनी हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सोबतच मुक्या प्राण्यांसाठी संस्थेच्या युवा सदस्यांकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहितीही घेतली.

बातम्या आणखी आहेत...