आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी 180 मंडळांनी केले विसर्जन:पावसाने वाढवला गणेशभक्तांचा उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, ११ सप्टेंबर रोजी ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यातील १८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पावसाने हजेरी लावलेली असतानासुद्धा बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेल्या गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यंदा मोठ्या उत्साहात जिल्हाभरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शहरी आणि ग्रामीण, असे मिळून २ हजार ७९ गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली. यंदा निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. शहरासह जिल्ह्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात सुरू आहे.

दि. ९ सप्टेंबरपासून शहर व जिल्ह्यात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी जिल्हाभरातील शहरी आणि ग्रामीण, असे मिळून ७१३ मंडळाने विसर्जन केले. शनिवार, दि. १० सप्टेंबर रोजी शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून ९८३ गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन पार पडले आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ह्या अशा जयघोषात बाप्पाला निरोप दिला. तसेच रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात भर पावसात गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात १८० शहरी व ग्रामीण सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...