आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच महिन्यांनंतर बस सुरळीत होत असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे. गर्दीचा हंगाम असल्याने एसटी प्रवाशी संख्या आणखी वाढणार आहे. असे असतांना सुविधांचा अभाव असल्याने मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याची असुविधा, स्वच्छतेचा अभावामुळे बसस्थानक समस्यांचे आगार बनले असून, प्रवासी मात्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे बेजार झाले आहेत.
कोरोनापासून सामसुम झालेले बसस्थानक निर्बंध हटल्यानंतर आता गर्दीने फुलू लागले आहे. प्रवाशांची पावले पुन्हा लालपरीकडे वळत आहेत. सध्या गर्दीचा हंगाम सुरू झाला असून एसटीचे भारमान वाढले आहे. दुसरीकडे बसस्थानकात सुविधा तर जाऊ द्या परिसरात दगड आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस आल्यानंतर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे विभागीय कार्यालयातील स्वच्छता गृहाचे पाणी थेट बसस्थानकात येत आहे.
परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याच्या मधोमध स्वच्छता गृहाचे पाणी येत असल्याने प्रवाशांना यातून मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर विभागीय कार्यालय आहे. याच कार्यालयाचे पाणी बसस्थानकात येत असतानाही कोणाचेही लक्ष याकडे नाही. बसस्थानकात काही ठिकाणी घाण साचली आहे.
त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नियमित साफसफाई अभियान राबवण्याची गरज आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून नियमित बसेस सुरू झाली आहे. हजारो किलोमीटर या बसेसचा दररोज प्रवास आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचार्यांचा ताफा आहे. यामध्ये वाहक आणि चालकांचा समावेश आहे. तरीही प्रवाशांची दैनाच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.