आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत:मतदानाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेची अमूल्य देणगी आहे ; शालेय निवडणूकीत उत्कर्षा मानकर विजयी

दिग्रस16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही प्रणित सर्वात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेची ओळख जगभर आहे. स्वातंत्र्यानंतर आजतागायत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधींचेच शासन भारतावर आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांचे मत सर्वश्रेष्ठ व अमूल्य ठरते तसेच भारतीय राज्यघटनेची अमूल्य देणगी म्हणजे मतदानाचा अधिकार होय, असे मत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी व्यक्त केले.

तसेच भारतीय नागरिकांना त्यांच्या मतांचे महत्त्व कळावे व त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध प्रकारे जनजागृती केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेचा अनुभव यावा म्हणूनच शाळा व महाविद्यालय स्तरावर दरवर्षी निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक घेतल्या जाते व यामध्ये विद्यार्थी सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद असल्यामुळे शाळा महाविद्यालयाची निवडणूक प्रत्यक्ष पार पडली नव्हती.परंतु यावर्षी विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक बॅलेट पेपरद्वारा प्रत्यक्ष घेण्यात आली मतदानाद्वारे सहभाग नोंदवता आला. शैक्षणिक सत्र २०२२ -२३ च्या शालेय निवडणूकीत इयत्ता आठवी मधील उत्कर्षा मानकर ही विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आली. या निवडणूकीत उप-विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सेजल देवस्थळे निवडून आली तसेच तृतीय स्थानावर रूपेश राठोड निवडून आला. या निवडणूक प्रक्रियेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीत आपल्या आवडीच्या शालेय विद्यार्थी प्रतिनिधीला आपले अमूल्य मत देण्याचा अधिकार होता. लवकरच या सर्व विजयी उमेदवारांचा शपथ विधी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची व्यवस्था मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे, नितीन राऊत, विलास राऊत व शिक्षक युवराज महोकर, शिक्षिका प्रीती बाखडे कल्याणी दहिफळे, सरिता गौर, धनश्री गावंडे, आरती जाधव, स्मिता चिंतावर, पूनम धनुका, कृपाली कपीले यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...