आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याने खड्डा वाहतुक व्यवस्था बंद पडल्याने विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग महागाव अंतर्गत येणाऱ्या सातघरी ते माळ वाकद या रस्त्याचे अंदाजे चार वर्षांपुर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला. परंतू तत्कालीन अधिकारी व कंत्राटदाराने मिली भगत करून या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली.
परंतू मागील पंधरा दिवसांपासून चालु असलेल्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मधोमध भला मोठ्ठा खड्डा पडल्याने वाहतुक बंद पडली, याचा परिणाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नेणारी बस सेवा बंद झाली. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली खते आणणे अवघड झाले तर रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा ईतर ठिकाणी जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे.
कोणतेही वाहन गावात येत नसल्याने रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे कोणतेही वाहन गावात येत नसल्याने वाहतुक व्यवस्था पूर्णतः बंद पडल्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मोठी कसरत करावी लागत असुन वेळेवर खते मिळत नसल्याने शेतातील पिकांची अवस्था वाईट बनली आहे त्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे. मोहन चव्हाण, गावकरी माळवाकद.
खड्डे तत्काळ बुजवण्याचे कंत्राटदाराला सांगितले
सातघरी ते माळ वाकद रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती मिळताच पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी दोन मोठे खड्डे आढळुन आले. या रस्त्याचे काम नव्याने मंजुर झाले असुन त्याकरिता लागणाऱ्या साहित्याची रॉयल्टी अद्याप मिळाली नसल्याने कामास विलंब होत आहे. तत्पूर्वी याखड्डयामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे कंत्राटदाराला सांगितले आहे.
विवेक जोशी, प्रभारी उपविभागीय अभियंता जि.प.बांधकाम महागाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.